आयनॉक्सने सादर केले ‘मेगाप्लेक्स’– कमाल फॉरमॅट व अनुभव असणारे जगातील पहिले मल्टिप्लेक्स
• एकाच ठिकाणी जास्तीत जास्त सेवा व तंत्रज्ञानावर आधारित फॉरमॅट उपलब्ध करणारे जगातील पहिलेवहिले मल्टिप्लेक्स
• 11स्क्रीन व 5 भव्य लॉबी असणारे, 60,000 हून अधिक चौरस फूट क्षेत्र असणारे, 1586 आसने असणारे
• आयनॉक्सचे आजवरचे सर्वात मोठे मल्टिप्लेक्स, ‘मेगाप्लेक्स’हे उत्कृष्ट आर्किटेक्चरचे उदाहरण, फूडसाठी उल्लेखनीय ठिकाण व जाहिरातदारांसाठी पर्वणी
• 11 स्कीनमुळे मेगाप्लेक्समध्ये दररोज 50-55 शो दाखवणे शक्य, ऑन-स्क्रीन जाहिरातीसाठी पुरेशी संधी
मुंबई, 16 ऑक्टोबर 2019: आयनॉक्स लिजर लि. (आयनॉक्स) या देशातील झपाट्याने वाढत्या मल्टिप्लेक्ससाखळीने आज ‘मेगाप्लेक्स’ हे सिनेमा पाहण्यासाठी जास्तीत जास्त फॉरमॅट व सेवा उपलब्ध असणारे जगातील पहिलेमल
्टिप्लेक्स मुंबईतील इनऑर्बिट मॉल मालाड येथे दाखल केले आहे.आयनॉक्सचे आजवरचे हे सर्वात मोठे मल्टिप्लेक्स60,000 चौरस फुटांहून अधिक क्षेत्रावर बांधले आहे आणि त्यामध्ये 1586 आसने इतकी आसनक्षमता आहे. सिनेमा पाहण्यासाठी सर्वाधिक पसंती असणाऱ्या मेगाप्लेक्समध्ये दररोज 60 शो दाखवण्याची आणि 6000 प्रेक्षकांना सामावून घेण्याची क्षमता आहे.
ब्रँडच्या “लिव्ह द मूव्ही” या ब्रीदच्या अनुषंगाने, आयनॉक्सने हे भव्य प्रमाणातील मनोरंजनाचे ठिकाण उभारले आहे. येत्या काळात हे देशातील सर्वात लोकप्रियमल्टिप्लेक्सबनण्याची शक्यता आहे. जीवनशैलीचा अविस्मरणीय अनुभव देण्यासाठी तयार केलेले मेगाप्लेक्सहे ‘लक्झरी’, ‘सेवा’ व ‘तंत्रज्ञान’ यांचे प्रतिक असेल आणि सर्व वयोगटातील प्रेक्षकांना सिनेमाचा अपूर्व अनुभव देणारे असेल.
सर्व 11 स्क्रीनमध्ये, मेगाप्लेक्स आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या आणिआयनॉक्सच्या स्वतःच्या फॉरमॅटचा आनंद देणार आहे.
– INSIGNIA:लेदर रिक्लायनर, बटलर ऑन कॉल, लेसर प्रोजेक्शन व लाइव्ह किचनची सेवा असणारे अविस्मरणीय डायनिंग कॅटलॉग अशी सेवा देऊन प्रेक्षकांना सिनेमा पाहण्याचा आलीशान अनुभव देणारा आयनॉक्सचा 7-स्टार फॉरमॅट.
– किडल्स:प्रामुख्याने छोट्या प्रेक्षकांसाठी तयार केलेल्या या फॉरमॅटमध्ये आकर्षक व ठसठशीत आसने व अंतर्गत सजावट आहे. तसेच, त्यामध्ये लॉबी असून तेथे बालकां
ना धमाल करता येऊ शकते.
– ScreenX:जगातील पहिले मल्टि-प्रोजेक्शन तंत्रज्ञान. यामध्ये 270 अंश पॅनोरॅमिक पद्धतीने सिनेमा पाहता येतो. ऑडिटोरिअममधील तीन भिंतींवर प्रोजेक्शन केले जाते.
– MX4D:या फॉरमॅटमध्ये अतिशय आधुनिक पद्धतीने सिनेमाचा अनुभव घेता येतो. आसने व थिएटरच्या भिंती यामध्ये असलेल्या 14 बिल्ट-इन मोशन्स व इफेक्टमुळे प्रेक्षकांना पडद्यावरील दृष्यांचा अद्वितीय अनुभव घेता येतो.
– IMAX:सिनेमाचा जगातील सर्वात उत्कृष्ट अनुभव. हृदयाची धडधड वाढवणारा ऑडिओ, 40% मोठे चित्र, ड्युएल प्रोजेक्शन सिस्टीम, सर्वोच्च गुणवत्ता असणारे 3D व आकर्षक अंतर्गत भाग.
– सॅमसंग Onyx LED:जगातील पहिले सिनेमा एलईडी तंत्रज्ञान, 10 पट अधिक ठळक व्हिज्युअल व जेबीएलचा सराउंड साउंड.
– मेनस्ट्रीम ऑडिटोरिअममधील डॉल्बी ATMOSसाउंड व लेसर प्रोजेक्शन यामुळे सिनेमाचा परिपूर्ण अनुभव मिळतो
मेगाप्लेक्स हे नावीन्यपूर्ण एफअँडबी संकल्पनांसाठी आणि गॉरमेट निवडीसाठीही पसंतीचे ठिकाण असेल.मेन्यूमध्ये भारतीय, लेबनीज, अमेरिकन, ओरिएंटल, इटालियन, ग्रिल व थाय अशा पर्यायांचा समावेश असेल, तसेच विविध प्रकारची पेये, पॉपकॉर्न व नाचो यांचेही प्रकार असतील. INSIGNIA येथे लाइव्ह किचनमधून सादर केलेल्या इन-सिनेमा डायनिंगपासून ऑनिक्स डिनर या मल्टिप्लेक्समधील भारतातील पहिल्या सिंगल सर्व्ह बफेपर्यंत वैविध्यपूर्ण पर्याय उपलब्ध आहेत.कॅफे अनविंड हा आणखी एक फूडचा पर्याय असून त्यामध्ये ताजी तयार केलेली कॉफी, डिटॉक्स ज्युस, बर्गर, सँडविच, आइसक्रीम व वॅफल यांची उपलब्धता असेल. किडल्स लाउंज येथील एफअँडबी काउंटरवर केवळ बालकांसाठी मेन्यू असतील. हे काउंटर काही निवडक फूड ब्रँड चालवणार असून त्यामध्ये 12 प्रकारे क्युझेन व 250 प्रकारचे पदार्थ सादर केले जाणार आहेत.
सिनेमा विश्वातील आर्किटेक्चरचा अद्भुत नमुना म्हणून, मेगाप्लेक्सने 5 भव्य लॉबींमध्ये उत्सवी व आलीशान अनुभव देण्यासाठी कमालीचे वैविध्य साधत, एक आदर्श निर्माण केला आहे.हाय-स्ट्रीट प्रेरित अंतर्भाग व मुबलक मोकळी जागा यामुळे सिनेमाप्रेमींना उत्तम अनुभव मिळेल. त्यांना ऑडिटोरिअमपर्यंत चालत जाता येईल. डिझाइनचे मुख्य आकर्षण म्हणजे, सोनेरी रंगाच्या गिल्डेड पाइपासून तयार केलेले इन्स्टॉलेशन. वैशिष्ट्यपूर्ण वाद्याचे हे आधुनिक स्वरूप आहे. सायलेंट मूव्हीच्या काळातील पाइप ऑर्गन प्राचीन कॉन्सर्ट हॉलमध्ये व थिएटरम
ध्ये वाजवला जातो.
11 स्क्रीनच्या मदतीने, जाहिरातदारांना 230 चौरस फूट इतक्या मोठ्या व्हीडिओ वॉलचा वापर करता येऊ शकतो. सोबत, पॉप-अप उपक्रम व कार्यक्रम यासाठी मध्यवर्ती लॉबी आहे.
याविषयी बोलताना, आयनॉक्सग्रुपचे संचालक सिद्धार्थ जैन यांनी सांगितले, “मेगाप्लेक्स ही केवळ भारतीय सिनेमातील समृद्ध लँडस्केपसाठीच नाही, तर जागतिक स्तरासाठीही मोठी झेप आहे.जगातील सर्वात मोठे फॉरमॅट असणारे मल्टिप्लेक्सम्हणून, मेगाप्लेक्सने जागतिक सिनेमा व्यवसायातील आयनॉक्सचे स्थान बळकट केले आहे. अत्यंत आकर्षक स्वरूप असणारे मेगाप्लेक्सहे जगभरातील सिनेमाप्रेमींनी एकदा तरी भेट द्यावेच, असे मुंबईतील ठिकाण ठरणार आहे. या वाटचालीमध्ये आम्हाला पाठिंबा देणाऱ्या सर्व तंत्रज्ञान भागीदारांचेही आभार. हे भव्य मल्टिप्लेक्स प्रत्यक्षात साकारणाऱ्या आमच्या टीमचेही अभिनंदन करायला हवे.”
आयनॉक्स लिजर लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अलोक टंडन यांनी सांगितले, “मुंबईमध्ये मेगाप्लेक्सदाखल करणे, हा आमच्यासाठी व्यवसायातील अत्यंत महत्त्वाचा व दूरगामी मैलाचा दगड आहे. येथे इतक्या मोठ्या स्वरूपामध्ये मनोरंजनाचा अनुभव मिळणार आहे. 11 स्क्रीनमुळे दररोज 60 शो दाखवणे आणि अंदाजे 6000 प्रेक्षकांना सामावून घेणे शक्य होणार आहे. आमच्या ‘अनुभव’ या धोरणाचा पाया म्हणून,हे मेगाप्लेक्सप्रेक्षकांबरोबरचे आमचे नाते अधिक गहिरे करणार आहे आणि त्यांना भव्य व जागतिक फॉरमॅट उपलब्ध करणार आहे, जेवणाचे आकर्षक पर्याय देणार आहे, तसेच आनंदी आठवणी निर्माण करण्याची संधी देणार आहे.”
आयनॉक्सलिजर लिमिटेड
आयनॉक्सलिजर लिमिटेड (आयनॉक्स) हा भारतातील सर्वात मोठ्या मल्टिप्लेक्स साखळीपैकी एक असून 68 शहरांमध्ये कंपनीचे 144 मल्टिप्लेक्स व 598 स्क्रीन आहेत. आयनॉक्सने भारतात सिनेमाचा पाहण्याचा अविस्मरणीय व 7-स्टार अनुभव सादर केला आहे. प्रत्येकआयनॉक्सप्रॉपर्टीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण आर्किटेक्चर आहे व शैली आहे. सर्वसाधारण स्क्रीनच्या पलीकडे, आयनॉक्सकडेचोखंदळ प्रेक्षकांसाठी आयनॉक्स INSIGNIA आहे आणि युवकांसाठी KIDDLES आहे किंवा उत्तम अनुभवासाठी MX4D® EFX थिएटर आहे किंवा निवडक ठिकाणी पॅनोरॅमिक व्ह्यूसाठी ScreenX आहे.आयनॉक्सनेआयनॉक्सलेसरप्लेक्स, आयमॅक्स व आयनॉक्सONYX याद्वारे नवे प्रोजेक्शन व ऑडिओ तंत्रज्ञान सादर केले आहे. आयनॉक्सने आता मेगाप्लेक्स, जगातील पहिला जास्तीत जास्त फॉरमॅट, जास्तीत जास्त अनुभव देणारा सिनेमा दाखल केला आहे. मल्टिप्लेक्सची काही वैशिष्ट्ये आहेत – आलीशान मायक्रो अॅडजस्टेबल लेदर रिक्लायनर्स, बटलर ऑल कॉल सुविधा, सेलिब्रेटी शेफकडून गॉरमेट मील पर्याय, डिझाइनर स्टाफ युनिफॉर्म.
आयनॉक्स, मूव्ही तिकीट बुकिंग, आकर्षक अपडेट, ट्रिव्हिया व ट्रेलर याविषयी अधिक माहितीसाठी पाहाwww.inoxmovies.com, आयनॉक्सलाFacebook, TwitterवInstagram यावर फॉलो करा आणि iOSवAndroid यावर अधिकृत आयनॉक्सअॅप डाउनलोड करा.